मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन 10 मेपासून; पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजन

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे ते १४ मे रोजीदरम्यान पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात पहायला मिळणार आहे. 11 ते 14 मे दरम्यान विद्यार्थी गौरव मेळावा, विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन, एआयविषयी मार्गदर्शन आणि डिजीटल इल्यूस्ट्रेशनवर डेमोस्ट्रेशन होणार आहे. त्यामुळे कलाप्रेमींसाठी ही एक मेजवानी असणार आहे.

अशी असेल चार दिवसीय कार्यशाळेची रूपरेषा

●११ मे रोजी ‘माजी विद्यार्थ्यांचा गौरव मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

● १२ मे रोजी मंथन आर्ट स्कूलचे डिरेक्टर शशिकांत गवळी यांचे ‘आर्ट स्कूलला प्रवेश घेण्यापूर्वी’ याविषयी विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शन असणार आहे.

● १३ मे रोजी अक्षय पंडीत यांचे ‘ए आय’ विषयी मार्गदर्शन होणार आहे. आणि दि.

●१४ मे रोजी अमर काळे यांचे ‘डिजीटल इल्यूस्ट्रेशनवर डेमोस्ट्रेशन’ होणार आहे.

कलाप्रेमी,आवड असणार्‍या विद्यार्थी-पालकांना या प्रदर्शनाचा व शिबीराचा लाभ घेता येणार आहे. हे कार्यक्रम मोफत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंथन आर्ट स्कूल तर्फे करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *