भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या तनावादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी X वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अखेर भारत-पाक यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी केली आहे.
काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या X वरील पोस्टमध्ये लिहलय की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन.
दरम्यान ट्रम्प यांच्या या घोषणानंतर पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दार यांनी एक्स वर म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान तात्काळ प्रभावाने शस्त्रसंधी करण्यास सहमत झाले आहेत. पाकिस्तानने आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता, या प्रदेशात शांतता व सुरक्षेसाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत!
आता 12 मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. एकमेकांवर गोळीबार न करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्याचंही परराष्ट्र सचिवाने सांगितलं. दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड होणार नसल्याचं भारतानं स्पष्टच सांगितलं आहे. दोन्हीकडून कोणतीही फायरिंग होणार नाही. मिल्ट्री कारवाई होणार नाही. जमीन, हवा आणि सागरी मार्गाने हल्ला होणार नाही. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांच्या बाजूने शस्त्रसंधी केली जात आहे. १२ तारखेला पुन्हा एकदा पाकिस्तानशी बोलणं होणार आहे.
Leave a Reply