उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार

मुंबई : महाराष्ट्र एसएससीचा निकाल उद्या१३ मे रोजी जाहीर होत आहे. विद्यार्थी त्यांचे दहावीचे गुण mahresult.nic.in वर त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून ऑनलाइन तपासू शकतात. दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार असल्याने लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अधिकृतपणे तारीख निश्चित केली आहे.

उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल

दहावीचा बोर्डाचा निकाल खालील साईट्सवर पाहू शकतात:

mahresult.nic.in वर
mahahsscboard.in वर

ऑनलाइन अकरावीची प्रवेश प्रक्रिया

दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *