नांदेड : लाडक्या बहिणींना आता 1500 तर मिळणारच त्यासोबतच आता कर्ज देखील देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले . महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातात. त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गंत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे.आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून 40 हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे.
मुखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवार बोलत होते. राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेवर ४५ हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला, तरी विरोधक अफवा पसरवतात. पण बहिणींनी विरोधकांच्या या अफवांवर विश्वास ठेवू नये. ही योजना बंद होणार नाही, असे पवार म्हणाले.आपल्या आग्रहावरून अजित पवार दोन वेळा नांदेडच्या दौऱ्यावर आले. येत्या काळात आपला पक्ष ‘नंबर वन’ असेल, असे आश्वासन देताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवार यांना आणखी दोन वेळा नांदेडमध्ये येण्याचा आग्रह केला. हा धागा पकडून आपल्या भाषणात अजित पवारांनी ‘मी पुन्हा येणार’ अशा शब्दांत चिखलीकरांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला
Leave a Reply