अमरावती : मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहे. मात्र अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्थी असणार असल्याचं आमदार मिटकरी म्हणालेत. अजित दादांवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांनी सर्वात आधी त्यांची माफी मागावी. त्यानंतरच एकीकरणावर चर्चा होणार असल्याचं आमदार मिटकरी म्हणालेत. यासोबतच दोन्ही पक्ष एकत्र हे अजित पवारांच्या नेतृत्वातच एकत्र यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये. शरद पवार हे देशाचे, राज्याचे आणि पक्षाचे कायम मार्गदर्शक आहेत असंही ते म्हणालेत.
इतकंच नाही तर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या बातम्यांही खोट्या आहेत असं मिटकरी म्हणालेत. त्यांनी स्पष्ट केलं की, “दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याचा विषय आमच्या बैठकीत अजिबात नव्हता.” त्यांनी हेही म्हटलं की, अशा चर्चा पेरल्या जात आहेत आणि त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही.मात्र, त्यांनी एक महत्त्वाचं विधान करत सांगितलं की, “जर एकत्र येण्याची वेळ आलीच, तर आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्थी असतील. जे लोक अजित पवारांवर खालच्या स्तरावर टीका करत होते, त्यांनी आधी माफी मागावी. त्यानंतरच एकत्र येण्याची चर्चा होईल आणि हे एकत्रिकरण अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच व्हावं, ही आमची अपेक्षा आहे.” दुसरीकडे, अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी एकत्र येण्याविषयी बोलल्याचं सांगितलं जात होतं. पण अमोल मिटकरी यांनी यावर स्पष्टीकरण देत असं काहीही अजित पवारांनी बैठकीत बोलल्याचं नाकारलं आणि अशा बातम्या पेरणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
Leave a Reply