आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार सुरू; आरसीबी विरुद्ध केकेआर एकमेकांना भिडणार

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पुन्हा सुरू होत आहे. आज शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. अजून १७ सामने खेळायचे आहेत ज्यात १३ लीग सामने, तीन प्लेऑफ आणि अंतिम सामना यांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स वगळता सर्व फ्रँचायझी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.संघांसमोर एक मोठे आव्हान असेल ते म्हणजे त्यांच्या परदेशी स्टार्सना पटवून देणे जे आधीच मायदेशी परतले आहेत. एका अहवालानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्या खेळाडूंच्या हक्कांचे रक्षण करेल जेणेकरून ते हंगाम वगळू शकतील आणि भविष्यात कोणतेही परिणाम टाळू शकतील. सध्या, गुजरात टायटन्स १६ गुणांसह आणि ०.७९३ च्या नेट रन-रेटसह प्लेऑफसाठी पात्रतेच्या शर्यतीत आघाडीवर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही १६ गुण आहेत, पण त्यांचा NRR .४८२ आहे, ज्यामुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्ज १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स १४ गुणांसह पहिल्या चारमध्ये आहे.

असा आहे नवीन टाईम टेबल

17 मे – सायंकाळी 7.30 – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगळुरू

18 मे – दुपारी 3.30 – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, जयपूर

18 मे – सायंकाळी 7.30 – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली

19 मे – सायंकाळी 7.30 – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ

20 मे – सायंकाळी 7.30 – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली

21 मे – सायंकाळी 7.30 – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

22 मे – सायंकाळी 7.30 – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, अहमदाबाद

23 मे – सायंकाळी 7.30 – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – बेंगळुरू

24 मे – सायंकाळी 7.30 – पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर

25 मे – दुपारी 3.30 – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अहमदाबाद

25 मे – संध्याकाळी 7.30 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली

26 मे – संध्याकाळी 7.30– पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

27 मे – संध्याकाळी 7.30– लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु

आयपीएल 2025 प्लेऑफ वेळापत्रक
29 मे – संध्याकाळी 7.30 – क्वालिफायर 1
30 मे – संध्याकाळी 7.30 – एलिमिनेटर
1 जून – संध्याकाळी 7.30 – क्वालिफायर 2
3 जून – संध्याकाळी 7.30– अंतिम सामना

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *