बीड : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील परळी तालुक्यात गोट्या गित्ते नावाच्या तरुणाने आणि त्याच्या गँगने जलालपूर येथे एका शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. शिवराज हा लिंबुटा येथील आहे. त्याला परळीतील टाकेवाडी येथे नेण्यात आले आणि त्याला मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसतं की, पीडित तरुण हा जीवाच्या आकांताने ओरडत आहे. त्याला लाठ्या काठ्यांनी हल्ला करत मारहाण केली जात आहे. या प्रकरणात काहींना अटक करण्यात आली आहे. ही घटना अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान घडली.या प्रकरणात संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तेलगाव येथून चार हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर इतर तिघांना परळीतून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी इतर सात जणांना ताब्यात घेतलं आहे. तर उर्वरित हल्लेखोरांचा पोलीस खोलवर तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
परळी तालुक्यातील जलालपूर येथे हरिनाम सप्ताहाच्या सांगतेदरम्यान प्रसाद जात असताना
लिंबुटा येथील शिवराज दिवटे या तरुणावर
टोकवाडी परिसरातील काही टवाळखोर मुलांनी, उचलून नेऊन टोकवाडी परिसरातील रत्नेश्वराच्या मंदिराजवळील डोंगरावर नेऊन अमानुष मारहाण करत व्हिडिओ शूट केला. जवळच लग्न सुरू असल्यामुळे, त्याचा ओरडण्याचा आवाज तेथील लोकांना आला.मदतीचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी हस्तक्षेप करत मुलाचा जीव वाचवला. मात्र या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.
Leave a Reply