सिंधुदुर्ग नगरी : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी राज्यातील पत्रकारांना सन्मानित केले जाते. 2024 च्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 25,000 रूपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेचे माजी अध्यक्ष, नामवंत वक्ते, लेखक, नाटककार, चित्रपट निर्माते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी संपादक आचार्य अत्रे पुरस्कार महाराष्ट्र रिसर्च सेंटर चे संचालक, ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे यांना जाहीर झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. परिषदेच्यावतीने इतरही पुरस्कार दिले जातात, ते खलील प्रमाणे.
●इलेक्ट्रॉनिक मिडियासाठीचा शशिकांत सांडभोर पुरस्कार- अभिजित करांडे, मुंबई तक
●प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार-अमेय तिरोडकर, मुंबई
●भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार- पांडुरंग पाटील, अंमळनेर
●नागोजीराव दुधगावकर पुरस्कार -सर्वोत्तम गावरस्कर बीड, सुराज्य दैनिकाचे संपादक
●दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार – दिनेश केळुसकर, गोवा, सकाळ संपादक
●महिला पत्रकारांसाठी असलेला सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार – सीमा मराठे, सिंधुदुर्ग
● माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार- बाळासाहेब पाटील, अँग्रोवन
●संतोष पवार स्मृती पुरस्कार – भारत निगडे, पुणे
एस.एम.देशमुख यांनी सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.शनिवारी बाळशास्त्री जांभेकर यांची 179 वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त बाळशास्त्री जांभेकर स्मारकात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक सभा देखील बाळशास्त्री जांभेकर स्मारक सिंधुदुर्ग येथे पार पडली.त्यावेळी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, माजी अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, गणेश जेठे आदि उपस्थित होते.
Leave a Reply