मुंबई : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान बोलताना यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भाषणाच्या शेवटी बोलताना सरन्यायाधीशांनी एका मुद्द्यावर नाराजीही व्यक्त केली.ते म्हणाले की, “आपण म्हणतो लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधीपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत. अशावेळी सर्वांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे. “महाराष्ट्राचा एक व्यक्ती सरन्यायाधीश बनून पहिल्यांदा महाराष्ट्रात येत असताना महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक किंवा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तिथं येण्याची गरज वाटत नसेल, त्यांनीच त्याचा विचार करावा,” अशा शब्दांत गवई यांनी नाराजी व्यक्त केली.
“मला प्रोटोकॉलचा बिल्कुल विचार नाही. मी अमरावतीला, नागपूरला जातो तेव्हा पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला मी मित्रांच्या मोटारसायकलवरुन फिरायचो. परंतु हा इतर पालिकांकडून न्यायपालिकेला आदराचा प्रश्न आहे,” अशा शब्दांत न्या. गवई यांनी त्यांच्या भावना मांडल्या. राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख याठिकाणी येत असताना त्यांनी दिलेली वागणूक योग्य आहे की नाही, याचा विचार त्यांनीच करायला हवा असंही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले. पण मला या लहान सहान गोष्टीत रस नाही, पण लोकांना समजावं म्हणून मी याचा उल्लेख केला, असं त्यांनी सांगितलं.
भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केल्यानंतर वाटचाल करत असताना, न्यायपालिकेतील सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळणं याचा आनंद आहे, अशा शब्दांत भूषण गवई यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.या 75 वर्षांच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचंही सरन्यायाधीश म्हणाले.न्या. गवई यावेळी म्हणाले की, भारताचं संविधान हेच सर्वोच्च असून, लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी त्यानुसार काम करणं अपेक्षित आहे,
Leave a Reply