महाराष्ट्र विधान भवन परिसरात लागली, पुढे काय झालं?

मुंबई, एजन्सी: महाराष्ट्र विधान भवन संकुलाच्या गेटवर बसवलेल्या स्कॅनिंग मशीनला आग लागली. या अपघातात कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. विधानभवन संकुलातील एका केबिनमध्ये किरकोळ आग लागल्याचे सभापती राहुल नार्वेकर यांनी सांगितले. सुरुवातीच्या तपासात, स्कॅनिंग मशीनमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मानले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असल्या तरी, कर्मचाऱ्यांनी पाच मिनिटांत आग आटोक्यात आणली.आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानभवन संकुलातील एका केबिनमध्ये किरकोळ आग लागली आणि प्राथमिक तपासात स्कॅनिंग मशीनमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे संभाव्य कारण समोर आले आहे. ते म्हणाले चिंतेची बाब नसून आग आटोक्यात आणली गेलीय, असं ते म्हणाले .या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नुकताच सोलापूर एमआयडीसी आगीचे प्रकरण ताजे असताना आता राज्याच्या विधिमंडळा परिसरातचं लागल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर येथे टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे भीषण आग लागल्याने 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आणि आज ही ही घटना घडली

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *