मुंबई : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मंगळवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना १ जून रोजी खेळला जाणार आहे.
क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामन्याबाबतही नवीन अपडेट
आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना न्यू चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये खेळवला जाऊ शकतो. याशिवाय, ३० मे रोजी खेळला जाणारा एलिमिनेटर सामनाही नवीन चंदीगडमधील मुल्लानपूर येथे आयोजित केला जाऊ शकतो. क्रिकबझच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. आयपीएल किंवा बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.देशात हळूहळू पावसाळा सुरू होत असल्याने, बीसीसीआयने हवामान लक्षात घेऊन ही ठिकाणे निवडल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणास्तव अहमदाबादची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
हे तिन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), पंजाब किंग्ज (PBKS) आणि गुजरात टायटन्स (GT) यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. दिल्ली कॅपिटल्स किंवा मुंबई इंडियन्स हे चौथे संघ असतील हे देखील निश्चित झाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK), राजस्थान रॉयल्स (RR), सनरायझर्स हैदराबाद (SRH), लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
यापूर्वी अंतिम सामना २५ मे रोजी खेळवण्यात येणार होता
यापूर्वी असे वृत्त होते की आयपीएल २०२५ चा अंतिम सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाईल, परंतु भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल सुमारे एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले. या कारणास्तव, आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे वरून ३ मे रोजी हलवण्यात आला. आता हे निश्चित झाले आहे की आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
Leave a Reply