आयफोन उत्पादक कंपनी अॅपलच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलवर २५% कर लादण्याची धमकी दिली आहे. शुक्रवारी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोन स्मार्टफोन अमेरिकेत तयार न केल्यास अॅपल उत्पादनांवर २५ टक्के कर लादण्याची धमकी दिली. ट्रम्पच्या धमकीनंतर अॅपल कंपनीत घबराटीचे वातावरण आहे. जर ट्रम्पने त्यावर २५ टक्के कर लादला तर जगभरात अॅपल उत्पादनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. यामुळे कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीवरही परिणाम होऊ शकतो.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की जर अॅपलने भारतात किंवा अमेरिकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात आयफोनचे उत्पादन केले तर त्यांना २५ टक्के आयात शुल्क भरावे लागेल. याआधीही ट्रम्प यांनी अॅपलला भारतात गुंतवणूक करू नये असे सांगितले होते. अॅपल आपले उत्पादन चीनमधून भारत आणि इतर देशांमध्ये हलवत होते. व्हाईट हाऊसच्या निशाण्यावर असलेल्या अमेझॉन, वॉलमार्टसह इतर मोठ्या कंपन्यांमध्ये आता अॅपल कंपनीही सामील झाली आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या अनिश्चितता आणि चलनवाढीच्या दबावाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न या कंपन्या करत आहेत. “मी अॅपलच्या टिम कुकला खूप पूर्वी सांगितले होते की अमेरिकेत विकले जाणारे त्यांचे आयफोन भारतात किंवा इतर कुठेही नव्हे तर येथेच तयार केले जावे, अशी माझी अपेक्षा आहे,” असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिहिले. जर असे झाले नाही तर अॅपलला अमेरिकेला किमान २५ टक्के शुल्क द्यावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले.
कंपनी चीनमधून भारतात स्थलांतरित होण्याच्या विचारात आहे
ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या शुल्काला प्रतिसाद म्हणून पुरवठा साखळी समायोजित करण्यासाठी अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या नेतृत्वाखालील कंपनी आयफोन उत्पादन भारतात हलवण्याचा विचार करत होती. या योजनेमुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निराश झाले आहेत. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे कंपनीची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे, कारण जर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला तर अमेरिकेत आयफोनच्या किमती वाढतील. याचा परिणाम अॅपल कंपनीच्या नफ्यावरही होऊ शकतो.
Leave a Reply