मुंबई : बीसीसीआयने शनिवारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीसह या ५ खेळाडूंना बीसीसीआयने निवडलेल्या संघात स्थान मिळालेले नाही.अय्यर सध्या भारताच्या एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याने गेल्या काही काळापासून उत्तम कामगिरी केली आहे. त्याने देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. तरीही, त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेली नाही.
शमीला देखील डच्चू
वेगवान गोलंदाज शमीला देखील भारतीय कसोटी संघात स्थान मिळाला नाही. शमी अजूनही पूर्णपणे फिट नाही. शमी या वर्षीच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. पण या हंगामात तो फारसी चांगली कामगिरी करू शकला नाही.अष्टपैलू अक्षर पटेलने भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. अक्षर तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करत आहे. पण इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात त्याचे नाव नाही.
मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान जो काही काळापासून भारतीय कसोटी संघाचा भाग आहे. त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. पण आता त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही.भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. पण त्याला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. तोही इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाही.
Leave a Reply