बीसीसीआयने IPLच्या फायनलसाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना केले आमंत्रित

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्युट म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व प्रमुखांना इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन प्लेऑफ सामन्यांच्या शेवटी राहिलेल्या शेवटच्या दोन स्थायी संघांमध्ये होईल.ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी, भारतीय बोर्डाने सशस्त्र दलांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे. “ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी आम्ही सर्व भारतीय सशस्त्र दल प्रमुख, उच्चपदस्थ अधिकारी आणि सैनिकांना आमंत्रित केले आहे,” असे सैकिया यांनी पीटीआयला सांगितले.

“नऊ दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे १०० दहशतवादी मारले गेले होते. या कारवाईसाठी सशस्त्र दलांच्या “शौर्य, धाडस आणि निःस्वार्थ सेवेला” सलाम करतो असे त्यांनी सांगितले. “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत केलेल्या “वीर प्रयत्नांचे” त्यांनी कौतुक केले. “श्रद्धांजली म्हणून, आम्ही समारोप समारंभ सशस्त्र दलांना समर्पित करण्याचा आणि आमच्या वीरांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट हा राष्ट्रीय उत्साह असला तरी, राष्ट्र आणि त्याच्या सार्वभौमत्वापेक्षा, अखंडतेपेक्षा आणि आपल्या देशाच्या सुरक्षिततेपेक्षा मोठे काहीही नाही,” असे सैकिया म्हणाले. निमंत्रणानुसार, जनरल उपेंद्र द्विवेदी (लष्करप्रमुख), अडमिरल दिनेश के. त्रिपाठी (नौदलप्रमुख) आणि एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग हे अंतिम सामन्यात उपस्थित राहणार आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक ठार झाले होते, त्यानंतर दोन्ही देशांमधील लष्करी संघर्षाला सुरुवात झाली. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल काही काळासाठी स्थगित करण्यात आले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *