पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची “नॅपकिन स्टाईल” ची खिल्ली उडवल्यानंतर आता भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नॅपकिन वाटले. गेल्या महिन्यात तटकरे यांनी एका पक्षाच्या कार्यक्रमात खांद्यावर टॉवेल घेऊन गोगावले यांच्या वागणुकीची खिल्ली उडवली होती. आता वाढदिवसाच्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटून समर्थकांनी तटकरे यांनी डिवचले आहे. एवढेच नाही व्यासपीठावरून गोगावले, थोरवे आणि दळवी यांनी नॅपकिन दाखवले तर खाली महिला-पुरुषांनी नॅपकिन दाखवून आपण गोगावले यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. यावेळी गोगावले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 62 किलोंचा केक कापण्यात आला.शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांचा उल्लेख चिटर फॅमिली असा केला. एवढेच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नाही युती होईल. शिवसेना आणि भाजप युती होईल, राष्ट्रवादी कुठेच नसेल असा दावाही त्यांनी केला.
कर्जतचे शिवसेना आमदार यांनी भरतशेठ जिंदा दिल आहेत हे सांगताना थेट तटकरे यांच्यावर शायरीतून हल्लाबोल केला. जिंदगी जिंदा दिली का नाम हैं, तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता हैं, अशी टीका त्यांनी केली. तसेच ज्या दिवशी तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली त्याचवेळी उलटी गणती सुरू झाल्याचेही ते म्हणाले. तसेच सिंचन घोटाळा फाईल अजून बंद झाली नाही, कायदा आम्हालाही समजतो या शब्दांत त्यांनी सुनील तटकरे यांना इशारा दिला.भरत गोगावले यांची इच्छा पूर्ण होवो, अशी शुभेच्छा देताना नॅपकिन खूप महत्त्वाचा आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले. त्याचवेळी महायुती रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी नसली तरी भाजप आणि शिवसेना एकत्र असेल, असे दरेकर म्हणाले.
गोगावले आणि तटकरे यांच्यात जुना वाद पुन्हा सुरू झाला आहे. ज्याला तटकरे यांच्या कन्या आणि महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बनवण्यात आल्यानंतर नवे वळण मिळाले. या पदावर गोगावले आधीच लक्ष ठेवून होते. या निर्णयापासून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष दिसून येत आहे. वाद टाळण्यासाठी आणि सर्व काही ठीक आहे हे दाखवण्यासाठी सरकारने रायगडच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयावर आळा घातला होता.
या वादाचे कारण काय?
शिवसेना रायगड पालकमंत्री पदाची मागणी करत होती. याचे कारण म्हणजे जिल्ह्यात त्यांच्या आमदारांची संख्या जास्त आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही आपला दावा सोडत नव्हती. रायगड पालकमंत्रीपदावरून बरीच राजकीय उलथापालथ झाली. तटकरे यांनी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी राज्यापासून केंद्रापर्यंत हात आजमावला. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यांच्या घरी जाऊन जेवण केले. त्यानंतर सर्व काही निश्चित झाल्याचे मानले जात होते.
शिवसेनेचे भरत गोगावले, रोजगार हमी योजना मंत्री आहे. त्यांना पालकमंत्री पद हवे होते. परंतु हे पद महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आले. अदिती या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. जानेवारीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती. यामागील कारण शिवसेनेचा विरोध असल्याचे मानले जात होते.
Leave a Reply