मुंबई : संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. संजय राऊत यांनी महाजन यांना पक्ष फोडायला नेमलेला दलाल, अशी शब्दात केली होती. यावर गिरीश महाजन यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने आपण बडबड केली आहे. ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना आणि त्यांच्या शिवसेनेला शरद पवार साहेबांच्या मांडीवर नेऊन बसवले. काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवले आणि त्यामध्ये एवढी दलाली केली, तेवढी दलाली आजपर्यंत कोणीही केली नसेल. राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली आहे. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेले नाही. उद्धवजींनी त्यांना जर आवरले नाही तर पुढे त्यांच्याकडे कोणीही राहणार नाही. सगळी शिवसेना जमीनदोस्त होणार आहे, असं महाजन म्हणाले.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊत मी तर पक्षाचा पाईक आहे. मी 35 वर्षापासून निवडून येत आहे. मी कोण आहे? काय आहे? हे सर्वांना माहित आहे. पक्षासाठी मी काहीही करेल. पक्षवाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखं पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही, असा पलटवार त्यांनी केलाय. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, दलालीचा विषय काढाल तर कोरेगावच्या पत्राचाळीमध्ये आपण काय केले? किती दिवस जेलमध्ये राहिलात? आम्हाला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिली. उद्धवजींच्या शिवसेनेला खुशाल तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलं. सगळी शिवसेना तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात? अजूनही तुमची बडबड बंद झाली नाही तर उद्धवजींचं देव भलं करो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
काय म्हणाले होते राऊत?
संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडत म्हणाले, पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील पहिला दलाल गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणार पहिला माणूस म्हणजे गिरीश महाजन असेल. मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यांच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकश्या सुरू झाल्या, त्यावेळी ते (महाजन) पक्ष बदलायला तयार होते, असा मोठा गौप्यस्फोटही राऊतांनी केला. मी राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो असे निरोप तेच पाठवत होते. हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत अशी टीकाही राऊतांनी केली.
Leave a Reply