हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; ”होय मी गुन्हा केला…”

नाशिक : नाशिकचे उद्धव सेनेचे उपनेते आणि माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर त्यांनी पदाधिकारी निवडीबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता हकालपट्टीनंतर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, ”पक्षात उघडपणे नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर हो मी हा गुन्हा केला आहे’. गुन्ह्याची शिक्षा पक्षातून हकालपट्टी करण्यात होतं असेल तर त्यावर मी काय बोलणार?”

बडगुजर हे संजय राऊत यांचे राईट हँड समजले जायचे. गेल्याच आठवड्यात बडगुजर हे मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील भेटले होते. त्यानंतरच त्यांनी ही नाराजी व्यक्त केली होती. आज नाशिकमध्ये ठाकरे गटाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांचा फोन आला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्यानं बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरून खासदार संजय राऊत यांनी बोलताना संशयास्पद वातावरण होईल अशा भेटी टाळायच्या असतात. बडगुजर हे नाशिकची शिवसेना नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. बडगुजर यांनी कारवाई झाल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हकालपट्टीचा निर्णय हा एकतर्फी घेतल्याचं ते म्हणालेत.

काय म्हणाले सुधाकर बडगुजर?

पक्षात नाराजी व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही. पक्षाने जी कारवाी केली आहे, त्याला मी योग्यवेळी उत्तर देतील. मी आज नाशिकबाहेर पूर्वनियोजित दौरा असल्याने मला पक्षाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलो नाही. मी आता यावर काही बोलणार नाही, वेळ आली की सांगेल. पक्षामध्ये झालेल्या बदलांबदल मी नाराजी व्यक्त केलेली होती. पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतो पण हकालपट्टी केल्याने आता काही भेटायचा प्रश्न उरलेला नाही. जाहीरपणे मत व्यक्त करणं हा गुन्हा नाही. पक्षात जे नाराज नेते होते ते वेळोवेळी नाराज आहेत. मी त्यांची नावे जाहीर करणार नाही. हकालपट्टीचा निर्णय हा एकतर्फी असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *