”आहे त्या दरात एसी लोकल सुरू करणार”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मास्टर प्लॅन!

मुंबई : आहे त्या दरात एसी लोकलची सुविधा लवकरच सुरू करत असल्याचा मास्टर प्लॅन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सोमवारी लोकल रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले रेल्वे अपघाताच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्र्यांची असंवेदनशीलता, अशा आशयाची बातमी पाहिली. मात्र मंगळवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव माझ्यासोबत अडीच तास चर्चा करत होते.उपनगरातील सर्वाधिक वाढ मोदी सरकारच्या काळात झाली आहे. मेट्रो नेटवर्क न झाल्याने ओव्हरक्राऊडींग झाली आहे. काल बोलताना त्यांनी सांगितलं की, दरवाजे लावण्याचे काम करतोय. सरकारला व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल. तेवढं डिझाईन डोकं सरकारकडे आहे. दरम्यान, एसी ट्रेन द्यायच्या आणि त्या भाडं न वाढवता द्यायचा, असा मास्टर प्लॅन सरकारकडे असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मुंब्रा लोकल दुर्घटनेवर भाष्य केलंय.

 

सरकार भाडे न वाढवता AC लोकल आणण्याच्या तयारीत आहे. एसी ट्रेन द्यायच्या आणि भाडं न वाढवता द्यायचा, तसा प्लान तयार केलेला आहे. मात्र कालच्या घटनेतून आपल्याला शिकावं लागेल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करुन मार्ग काढेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शासकीय कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट दिलेला आहे. खासगी कार्यालयासंदर्भात अडचण येत आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टसंदर्भात कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करु, असेही ते म्हणाले. फडणवीस म्हणाले, ” रेल्वेमंत्र्यांनी यावर भर दिला आहे की मुंबईतील नॉन-एसी लोकल गाड्यांना दरवाजे नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा गाड्यांमध्ये दरवाजे बसवले जातील. व्हेंटिलेशनचीही काळजी घेतली जाईल. मुंबईत मोठ्या संख्येने एसी लोकल गाड्या चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु प्रवाशांवर भाड्याचा भार पडू नये अशा दिशेने काम केले जात आहे.”

 

रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी (EDIP) कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सोमवारी सांगितले की, मुंबईतील दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या ICF टीमसोबत सविस्तर बैठक घेतली. मुंबई उपनगरीय क्षेत्रातील स्थानिक नॉन-एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याच्या समस्येवर व्यावहारिक उपाय शोधणे हा त्याचा उद्देश होता. नॉन-एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याची मुख्य समस्या म्हणजे कमी वायुवीजनामुळे होणारा श्वास गुदमरणे. सविस्तर चर्चेनंतर, नवीन नॉन-एसी गाड्यांचे डिझाइन आणि उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गाड्यांमध्ये तीन डिझाइन बदल वापरून वायुवीजनाची मुख्य समस्या सोडवली जाईल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *