पुणे हादरले: घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलमध्ये काढले फोटो

पुणे: कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत शिरलेल्या एका व्यक्तीने एका संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली आहे. आरोपीने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करून सदनिकेत प्रवेश केल्याचे उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत कामाला आहे. ती गेल्या दोन वर्षांपासून शहरातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत आपल्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्याचवेळी आरोपी सदनिकेजवळ आला आणि त्याने दरवाजा वाजवला.

याबाबत २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका २८ ते ३० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने सदनिकेचा दरवाजा (सेफ्टी डोअर) उघडला असता, आरोपीने आपण कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी केली. तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.
परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तरुणीने पोलिसांना केलेल्या आरोपीच्या वर्णनावरून त्याचा शोध घेतला जात आहे. पसार झालेल्या आरोपीने तरुणीच्या मोबाइलमध्ये तिचे छायाचित्र काढले आहे. “मी परत येईन,” असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने घाबरलेल्या तरुणीने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *