शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ट्रस्ट बरखास्तीची घोषणा
मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ, शनि शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार आणि ‘बोगस भरती’ (बोगस कर्मचारी भरती) झाल्याचे समोर आले आहे. ट्रस्टचे विश्वस्त आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत या देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ तातडीने बरखास्त करण्याची घोषणा केली.
या घोषणेमुळे धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचारावर सरकार कठोर कारवाई करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, विश्वस्तांच्या अपसंपदेची (illegal assets) सखोल चौकशी केली जाईल आणि त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल केले जातील. “देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही,” असा कठोर इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी सांगित1ले की, यापुढे श्री शनैश्वर देवस्थान मंदिराचे संचालन शासनाच्या नियंत्रणाखाली असेल. पंढरपूरमधील विठ्ठल देवस्थान आणि शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या धर्तीवर मंदिराच्या व्यवस्थापनासाठी लवकरच एक शासकीय समिती स्थापन केली जाईल. या समितीच्या स्थापनेसाठी विधिमंडळाने कायदा मंजूर केला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल.
नेवासा तालुक्यातील (अहिल्यानगर जिल्हा) या शनि मंदिरातील घोटाळ्यांबद्दलची लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई जाहीर केली.

शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; मुख्यमंत्र्यांकडून ट्रस्ट बरखास्तीची घोषणा
•
Please follow and like us:
Leave a Reply