आदरणीय जगन्नाथ शंकर शेठ यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

देशासाठी, देशबांधवांसाठी आपली संपत्ती “लुटवणारा” धनाढ्य मराठी माणूस म्हणजे नाना शंकर शेठ ! ठाणे जिल्ह्यातील मुरबाड सारख्या छोट्या गावात जन्मलेले नाना “मुंबईचे आद्य शिल्पकार” होते. आपल्या व्यापार कौशल्याने एकोणिसाव्या शतकात अपार धनसंपत्ती मिळवणार्‍या नाना शंकर शेठ यांनी, या पैशाचा विनियोग स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबीयांसाठी न करता त्यातून समाजकार्याचा प्रपंच उभारला. कारण त्यांच्या मागे संत विचारांच्या संस्कारांची ताकद उभी होती.

महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक संपादक महेश म्हात्रे यांचे जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दलचे विचार

https://youtu.be/539vnD6-1Vg?si=Srwvbv-NfauV3kBQ

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे l उदास विचारे वेच करी l
ही संत तुकाराम महाराज यांची शिकवण नाना अक्षरशः जगत होते. त्यांच्या काळातील गुजराती-मारवाडी धनिकांचा नानांशी जवळचा संबंध होता. *धनलालसा* ही ज्यांच्या व्यापारामागील एकमेव प्रेरणा असते. त्यांचा दानधर्म सुद्धा *खाण्यापिण्या* पलीकडे जाणारा नसतो. हे नाना जाणून होते. त्यामुळे त्यांनी विवेकनिष्ठ पद्धतीने, पदरमोड करून , प्रसंगी ब्रिटिश सरकार विरोधी भूमिका घेऊन विकासाची वाट प्रशस्त केली. आरक्षण संरक्षणाच्या कुबड्या फेकून देणाऱ्या प्रत्येक मराठी तरुणाने नाना शंकर शेठ यांचे जीवन चरित्र डोळसपणे अभ्यासावे. आधुनिक काळात “महाराष्ट्र धर्म” काय करू शकतो याचा पुनः प्रत्यय देणारे नाना म्हणजे मराठी मन, मनगट आणि बुद्धीचा उत्तुंग आविष्कार !
स्वतःच्या बळावर मुंबई रेल्वेची पायाभरणी करणारे, हिंदू-मुस्लिम दंग्यात, हिंदूंच्या बाजूने उभे राहणारे, १८५७ च्या उठावाला आर्थिक रसद देणारे, आपल्या घरात मुलींची शाळा सुरू करणारे, उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देणारे
जगन्नाथ शंकर शेठ या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घ्यायची असेल तर आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हे पंधरा मिनिटांचे भाषण अवश्य ऐका.
तुम्हाला मराठी असल्याचा सार्थ अभिमान वाटेल !

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *