१ कोटी ३६ लाख मोबाईलची सेवा खंडित, सायबर गुन्हेगारीवर मोठा प्रहार

नवी दिल्ली: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, १ कोटी ३६ लाखांहून अधिक मोबाईल क्रमांकांची सेवा खंडित करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत ही माहिती दिली. दूरसंचार विभागाने नागरिकांकडून आलेल्या प्रतिक्रिया आणि तक्रारींच्या आधारावर ही कारवाई केली आहे.

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

दूरसंचार विभाग आणि गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. ‘डिजिटल इंटलिजन्स प्लॅटफॉर्म’ (DIP) नावाचे एक विशेष व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मवर ५२७० बँका, ३६ राज्य पोलीस दल आणि इतर ६२० संस्था एकत्र येऊन सायबर गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करत आहेत.

सायबर साथी’ ॲप आणि पोर्टल:

फसवणुकीची माहिती देण्यासाठी नागरिकांसाठी एक विशेष पोर्टल (२६ मे २०२३ पासून) सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलचा वापर आतापर्यंत २९.५ कोटींहून अधिक वेळा करण्यात आला आहे, ज्यातून सायबर गुन्हेगारीबद्दल नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता दिसून येते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून २९ जानेवारी २०२५ रोजी ‘सायबर साथी’ नावाचे मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले. हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रणालींवर उपलब्ध असून, आतापर्यंत ४४ लाखांहून अधिक लोकांनी ते डाउनलोड केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि आंतरराष्ट्रीय नंबरवर बंदी

खोटे मोबाईल क्रमांक शोधून काढण्यासाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनांचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ८३ लाख क्रमांकांची सेवा खंडित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, भारतीय सीमांच्या बाहेरून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

इतर महत्त्वाचे निर्णय:
* चुकीच्या पद्धतीने वापरले जाणारे २६ लाख सिमकार्ड आणि बोगस सिमकार्ड वापरणाऱ्या व्यक्तींना ३.६ लाख सिमकार्ड थांबवण्यात आले आहेत.
* मोठ्या प्रमाणात एकत्रित एसएमएस पाठवणाऱ्या १० हजार यंत्रणा निष्क्रिय करण्यात आल्या आहेत.
* अनधिकृत क्रमांकांची ओळख काढून फसवणूक करणाऱ्यांना ‘आपण ह्या असलेले मोबाईल कनेक्शन’ ही एक महत्त्वाची सेवा सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सायबर गुन्हेगारांवर अंकुश बसणार असून, नागरिकांची डिजिटल फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *