लालू प्रसाद यादव म्हणाले, इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्यावं…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी ‘इंडिया’चे नेतृत्व करण्याची तयारी दर्शवल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी मंगळवारी त्यांना समर्थन दिले. ‘ममता बॅनर्जींना इंडिया’ गटाचे नेतृत्व करू द्यायला हवे,’असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
शिवसेना (UBT) पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी नवी दिल्लीत सांगितले की, इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबाबत त्यांचा पक्ष चर्चा करण्यास तयार आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करूनही शिवसेना (UBT) पक्षाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. पुढे राऊत म्हणाले “आमच्या पक्षाचे काँग्रेस नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत. जर युती आणखी मजबूत करायची असेल, तर प्रत्येकजण नेतृत्वावर चर्चा करण्यास तयार आहे – मग ते ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद, शरद पवार किंवा अखिलेश यादव असोत. आम्ही या विषयावर चर्चा करत आहोत,” असे संजय राऊत म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर असमाधान व्यक्त केल्यानंतर दोन दिवसांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आपले मत व्यक्त केले. ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे संकेत दिल्यानंतर, यादव यांनी त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला.
Leave a Reply