नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असा आरक्षणाचा फायदा मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. समाजाची दिशाभूल करणाऱ्यांना अनुसरू नये, असे आवाहन त्यांनी केले. फडणवीस म्हणाले, “ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजालाही न्याय मिळवून देऊ. कितीही शिव्या मिळाल्या किंवा अपमान झाला तरी सामाजिक विण तुटू देणार नाही.” त्यांनी हे ही स्पष्ट केले की, संविधानिक चौकटीत राहूनच आरक्षणाचा तोडगा काढण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आंदोलकांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान चुकीच्या पद्धतीने वर्तन झाल्याचे त्यांनी मान्य केले. यापुढे अशी पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाहीही देण्यात आली.
दरम्यान, आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना काहीवेळा आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, “राजकारणात शिव्या-फुले चालतात, पण समाजाचे नुकसान होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.” राजकारणात कितीही संघर्ष झाला तरी समाजाची एकजूट अबाधित ठेवण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
👉 मुख्य मुद्दे :
मराठा समाजासाठी कोर्टात टिकणारा तोडगा.
ओबीसींवर अन्याय न करता आरक्षणाचा मार्ग.
आंदोलनात झालेल्या अराजकाबद्दल समाजाकडून दिलगिरी.
“शिव्या मिळाल्या तरी सामाजिक विण तुटू देणार नाही” – फडणवीस.
ही भूमिका मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
Leave a Reply