2027-28 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सात मंत्र्यांची विशेष समिती स्थापन केली असून भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री तसेच समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही शिखर समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. समिती कुंभमेळ्याच्या धोरणात्मक निर्णयांपासून ते तयारी आणि आयोजनापर्यंत सर्व बाबींचा आढावा घेणार आहे. या समितीत मंत्र्यांसोबत वेगवेगळ्या विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही सहभागी असणार आहेत.
समितीतील मंत्र्यांची नावे
प्रमुख गिरीश महाजन
1. छगन भुजबळ
2. दादा भुसे
3. उदय सामंत
4. जयकुमार रावल
5. माणिकराव कोकाटे
6. शिवेंद्रसिंह भोसले
दरवर्षी लाखो भाविक येणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनिक पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.
शिर्डी विमानतळावरील कामे पूर्ण करण्याचे निर्देश
कुंभमेळा कालावधीत वाहतूक आणि पर्यटक व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विमानतळावर विमान पार्किंगची सुविधा वाढविणे, पंचतारांकित हॉटेलची व्यवस्था करणे, तसेच नामांकित हॉटेल्स कंपन्यांना आमंत्रित करण्याची सूचना त्यांनी केली.
याशिवाय यवतमाळ विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. खासगी कंपन्यांनी चालवलेले विमानतळ मध्येच बंद पडल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशासनाला यातून दिशा मिळणार आहे.
Leave a Reply