मुंबईतील बहुचर्चित ₹१,०३९ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यामध्ये विशेष PMLA न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने प्रवीण राऊत, बिल्डर जितेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवीण राऊत हे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांचे भाऊ आहेत.
या प्रकरणाची सुरुवात २००७ मध्ये झाली. गुरूआशीष कन्स्ट्रक्शन्स (HDILची उपकंपनी) यांनी महाडासोबत करार करून ६७२ भाडेकरूंना घरे देण्याचे, तसेच ३,००० घरे MHADAला बांधून देण्याचे वचन दिले होते. मात्र वास्तवात हा करार पूर्ण न होता, कंपनीने FSI विकून तब्बल ₹१,०३४ कोटींचा अपहार केला.
ED च्या तपासात उघड झाले की या रकमेतून ₹९५ कोटी प्रवीण राऊत यांच्याकडे वळवले गेले. त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून ₹२१.०६ कोटींचा पैसा फिरवला गेला. बिल्डर जितेंद्र मेहतांनी तर भाडेकरूंची संमती मिळवण्यासाठी पैशांचा वापर केला आणि स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावावर तीन फ्लॅट्स घेतले.
या गैरव्यवहारामुळे ६७२ कुटुंबे आजही घराविना आहेत. “मराठी माणसासाठी” लढणाऱ्या पक्षाच्या प्रतिमेलाच या घोटाळ्याने धक्का दिला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे मान्य केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे.
हा घोटाळा केवळ पैशांचा नाही तर सामान्य भाडेकरूंच्या विश्वासघाताचा ज्वलंत दाखला ठरला आहे. आता न्यायालय खऱ्या अर्थाने दोषींना शिक्षा करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply