परदेशातील उच्च शिक्षणासाठी ४४ हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती…
महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने “सारथी परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती” दिली जाते. काही महिन्यांच्या विलंबानंतर, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) ने अखेर परदेशी उच्च शिक्षणासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. हे शिष्यवृत्तीसाठी अर्ज जुलै महिन्यात पूर्ण झाल्यानंतर, सप्टेंबरमध्ये यादी जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, यादी जाहीर करण्यात झालेल्या विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक योजनांमध्ये बदल करण्यास भाग पडले आहे. परंतु मध्येच विधानसभा निवडणुक आल्यामुळे ही प्रक्रिया लांबली होती . या संदर्भात सारथीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, निवडीचा हा फक्त पहिला टप्पा आहे. परदेशी विद्यापीठांसाठी दोन प्रवेश हंगाम असतात, आणि ७५ जागांचा कोटा संपूर्ण वर्षासाठी आहे. आम्हाला आशा आहे की पुढील टप्प्यात अधिक विद्यार्थ्यांची निवड होईल,”
मात्र, ७५ जागांपैकी ३० जागा रिक्त ठेवण्यावर टीका केली जात आहे. जास्तीतजास्त विद्यार्थी या योजनेत सामील होण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालयात या योजना पोहचल्या पाहिजेत. यावेळी २०० अर्जांमधून फक्त ४४ विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे, जर दोन हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले असते तर, त्या प्रमाणात किमान चारशे – पाचशे विद्यार्थी निवडले गेले असते . त्यामुळे पुढील वर्षापासून शासनाने एक खास मोहीम आखून सर्व महाविद्यालयात या विद्यार्थ्यांशी संबंधित योजना पोहचविणे आवश्यक आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षी तरुणाईला उच्च शिक्षण घेण्यासाठी समर्थ पर्याय उभे राहतील.
Leave a Reply