कोल्हापूर महिला सुधारगृहात धक्कादायक घटना; सहा नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात एका महिला सुधारगृहात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उघड होताच पोलिस व प्रशासन तातडीने हालचालीला लागले.

प्राथमिक माहितीनुसार, या सर्व महिलांना तत्काळ उपचारासाठी सीपीआररुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

या नृत्यांगनांना दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी कारवाईदरम्यान ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. आज अचानक त्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस आणि प्रशासनाने घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणानंतर सुधारगृहातील सुरक्षेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित महिला सुधारगृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या घटनेचा स्वतंत्र पंचनामा केला असून आत्महत्येच्या प्रयत्नामागील पार्श्वभूमीचा शोध घेतला जात आहे.

या धक्कादायक घटनेमुळे कोल्हापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून समाजातही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केल्याचं सांगितलं आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *