फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण; सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा गंभीर आरोप

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर गुरुवारी रात्री आपले जीवन संपवले. घटना फलटणमधील एका हॉटेलच्या बंद खोलीत साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. डॉक्टरच्या मृतदेहावर सुसाईड नोट सापडली असून त्यात तिने पोलिसांवर बलात्काराचा आरोप केला आहे.

सुसाईड नोटनुसार, पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी तिला चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर यांनीही मानसिक त्रास दिला, असा दावा डॉक्टरने केला आहे. या घटनेमुळे पोलिस आणि आरोग्य विभागातील वाद उघडकीस आले आहेत.

महिलेच्या काकांनी आणि आतेभावानेही गंभीर आरोप केले आहेत. काकांच्या मते, डॉक्टरवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता, ज्यामुळे ती मानसिक ताणाखाली होती. डॉक्टरने आपल्या वरिष्ठांना आणि नातेवाईकांना वारंवार सांगितले होते की, “तणावामुळे माझे आयुष्य संपवावे लागेल.” तसेच, आतेभावाने महिलेला फोन करणारे फलटण भागातील खासदार असल्याचा आरोप केला आहे.

महिलेच्या बहिणीने काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती, पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरची दुसरी चुलत बहीण मेडिकल ऑफिसर असून तिला काही महिन्यांपूर्वी दबावाबाबत माहिती होती.

सातारा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टम सुरू केले आहे. या प्रकरणातून डॉक्टरांवर होणाऱ्या मानसिक दबाव, आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पोलीस यंत्रणेतल्या गैरवर्तनाची गंभीर समस्या समोर आली आहे.

या घटनेमुळे फलटणसह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व प्रशासनिक चर्चेला तोंड फुटले असून, दोषींविरुद्ध त्वरित कारवाईची मागणी होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *