प्रेस क्लबमधील वादग्रस्त घटनेची चौकशी; व्यवस्थापन समितीने तीन सदस्यीय समिती नेमली

मुंबई : क्लबमध्ये २५ ऑक्टोबर २०२५ रोजी घडलेल्या वादग्रस्त घटनेवर व्यवस्थापन समितीने गंभीर दृष्टी घेतली आहे. या संदर्भात ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीला घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्यवस्थापन समितीकडून नेमण्यात आलेल्या या चौकशी समितीमध्ये नीता कोल्हटकर कन्व्हीनर सदस्य , निशांत सर्वंकर सदस्य आणि आशीष बनसोड, सदस्य यांचा समावेश आहे. समितीला घटनेशी संबंधित सर्व पुरावे तपासणे, साक्षीदारांची चौकशी करणे आणि सर्व संबंधितांना आपली भूमिका मांडण्याची संधी देणे अशा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, क्लबची प्रतिमा सोशल मीडियावर बदनाम करणाऱ्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्याचे निर्देशही समितीला देण्यात आले आहेत. क्लबच्या नियम, आचारसंहितेचे उल्लंघन झाले का आणि कोणत्या सदस्यांची जबाबदारी ठरते, हे तपासून समिती शिफारसीसह आपला सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

व्यवस्थापन समितीने म्हटले आहे की, “चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषींवर क्लबच्या नियमावलीनुसार कारवाई करण्यात येईल. क्लबची पारदर्शकता आणि शिस्त अबाधित ठेवणे हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे.”

या घटनेमुळे क्लबमधील अंतर्गत शिस्त, सदस्यांमधील संवाद आणि सोशल मीडियावरील जबाबदार वर्तन यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. समितीचा निष्कर्ष क्लबच्या भविष्यातील शिस्तबद्ध संस्कृतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *