इच्छामरणाचे प्रणेते प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई | ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि माजी शिक्षणमंत्री प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्दे मित्रमंडळ आणि परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता, वांद्रे (पश्चिम) येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत रामदास भटकळ असतील.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘सन्मानाचे मरण – शेवटचा उंबरठा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर, ‘लिव्हिंग विल’चे समर्थक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार, तसेच युवा लेखक प्रा. अजित जोशी सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे समन्वयक उदय दंडवते असतील. दुसऱ्या सत्रात ‘रंग अमनके’ – एल्गार साथीचा फोक फ्युजन बँड आणि बंकिम सॉनगकार यांच्या नवगीतांची मैफल रंगणार आहे.

समाजवादी विचारसरणीचे प्रतीक असलेल्या आणि ‘इच्छामरणा’च्या संकल्पनेचे प्रणेते ठरलेल्या प्रा. सदानंद वर्दे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.प्रा. वर्दे यांच्या कन्या आणि प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम वर्दे-परांजपे यांनी सर्व चाहत्यांना आणि समाजप्रेमींना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *