फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी
महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुती सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता काबीज केली. प्रचंड बहुमतासह सत्तेत परतलेल्या महायुती सरकारची कमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या फडणवीसांनी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांनी माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धमाका केला आहे.
“आतापर्यंत महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची (Gadchiroli) ओळख होती,पण यापुढे गडचिरोली शेवटचा नाहीतर राज्याचा पहिला जिल्हा असेल”असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवला होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपदही स्वत:कडेच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटले आहेत.पण या साडेसात दशकांनंतरही महाराष्ट्रातील अशी अनेक गावं आहेत,जिथं अद्यापही लाईट,एसटी बसची सेवा पोहचलेली नाही. गडचिरोली जिल्ह्यात जिथं माओवाद्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे, अशा भागात हेच चित्र पाहायला मिळतं. पण आता गडचिरोली जिल्ह्यात फडणवीस सरकारनं माओवाद्यांचा बंदोबस्त करत वेगवेगळे मोठे मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे… धाडसी बस प्रवास, हा त्यातील सर्वात लक्षणीय निर्णय आहे. नक्षलग्रस्त भागातील माओवादी अतिरेक्यांना आव्हान देत, तेथे सुरू झालेली बस सेवा आणि त्यातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला प्रवास. हा महाराष्ट्राच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे.
Leave a Reply