राज्यातील नगर पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी – 21 डिसेंबर 2024 रोजी – घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, त्या दिवसापर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.
दरम्यान, आज २ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये मतदान होत आहे. काही ठिकाणी, विशेष कारणांमुळे मतदानाची तारीख २० डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे, सर्व ठिकाणच्या मतमोजणीची प्रक्रिया आता एकत्रित २१ डिसेंबरलाच पार पडणार आहे.
या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत एकसमानता राखली जाईल, तसेच विविध तारखांना होणाऱ्या मतमोजणीमुळे निर्माण होणारी गोंधळाची शक्यता टळणार असल्याचे प्रशासनिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुव्यवस्थेसाठी न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


Leave a Reply