राज ठाकरे यांच्या हस्ते होणार संपादक कमलेश सुतार यांचा सन्मान

मुंबई : पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजप्रबोधनाला हातभार लावणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने दिला जाणारा, मानाचा “काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार” यावर्षी झी 24 तास चे संपादक श्री. कमलेश सुतार यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार वितरण समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार सोहळा बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता, प्रभादेवी, मुंबई येथील खेडे नाट्यमंदिर, मिनी थिएटर येथे आयोजित करण्यात आला आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान आचार्य अत्रे समिती, मुंबई व काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान यांच्या अध्यक्षा अॅड. सौ. आरती पुरंदरे सदावर्ते भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत विधीज्ञ अॅड. श्री. राजेंद्र पै (आचार्य अत्रे यांचे नातू) उपस्थित राहणार आहेत. यावेळी आरंभी “कुटुंब रंगलय काव्यात” फेम विसुभाऊ बापट यांचा कार्यक्रमही होणार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू, निर्भीड आणि जबाबदार कार्याचा गौरव करणारा हा पुरस्कार, यंदा एका अनुभवी संपादकाच्या वाट्याला आल्याने पत्रकारितेच्या वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *