सरलेल्या २०२४ मध्ये देशभरातील रस्ते अपघातांत एक लाख ८० हजार जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी १८ ते ३४ वयोगटातील १ लाख १८ हजार तरुणांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाहतूक क्षेत्रात बदलांची गरज : गडकरींचा १७ मुद्द्यांवर भर
वाहतूक विभागांच्या दोन दिवसांच्या बैठकीत गडकरी यांनी २७ राज्यांच्या मंत्र्यांशी विविध १७ मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन वाहतूक क्षेत्रातील त्रुटी दूर करून शाश्वत बदल घडवण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.
अपघातग्रस्तांसाठी सरकारकडून ‘कॅशलेस’ मदतीची हमी
देशातील कोणत्याही रस्त्यावर वाहन अपघात झाल्यास सरकार रुग्णासाठी सात दिवसांपर्यंत दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराचा खर्च करेल. अपघाती मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाइकांना दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा गडकरी यांनी केली.
परवान्याविना ३५ हजार बळी, वाहनचालक प्रशिक्षण धोरणावर भर
भारतात सध्या २२ लाख वाहनचालकांची कमतरता असून, परवान्याशिवाय गाड्या चालवण्यामुळे गेल्या वर्षी ३५ हजार बळी गेले. यासाठी प्रस्तावित वाहनचालक प्रशिक्षण धोरणामुळे ५० लाख रोजगार निर्माण होतील, असे गडकरी म्हणाले. साडेचार हजार कोटींच्या अनुदानातून १,२५० प्रशिक्षण आणि फिटनेस केंद्रे सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

अपघातात तरुणांचे वाढते बळी; २०२४ चा गंभीर अहवाल
•
Please follow and like us:
Leave a Reply