इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी शाळांची संख्या घटली; जागतिक मराठी संमेलनातील सूर

जागतिक मराठी अकादमी (Jagtik Marathi Akademi) आणि रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) सातारा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात सुरु असलेल्या शोध मराठी मनाचा या जागतिक संमेलनात ११ जानेवारी या दिवशी दुसऱ्या सत्रात ‘अभिजात मराठी आणि माध्यमे’ या विषयावर संवाद सत्र झाले. या संवाद सत्रात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी, बंगलोर येथील जगन्नाथ पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विनोद कुलकर्णी, नाशिकच्या मराठी विद्या प्रसारक संस्थेचे नितीन ठाकरे, मराठीतील बाल वाडमय लेखिका लीला शिंदे इत्यादी वक्ते म्हणून सहभागी झाले. संवादक म्हणून पत्रकार अरुण खोरे व महेश म्हात्रे यांनी संवादक म्हणून या विषयावर चर्चा घडवून आणली.
या सत्रात प्रारंभी चंद्रकांत दळवी (Chandrakant Dalvi) यांना विचारणा केली असता त्यांनी भाषा संचालनायाच्या (Bhasha Sanchalanalaya) अधिकारी यांना मराठीसाठी पुरेसे बजेट नसल्याने उत्साह नसल्याचे सांगून मराठी भाषेसाठी विशेष प्रोत्साहन द्यावे लागेल, असे म्हणाले. रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला जाणवत आहे की, मराठी माध्यमाच्या काही माध्यमिक शाळा आहेत किंवा प्राथमिक शाळांच्यामध्ये सुद्धा इंग्लिश मीडियमला मुलांना घालण्याची जी काही एक लाट आली आहे. त्या लाटेमध्ये मराठी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत चाललेली आहे पटसंख्या घटनेमागचे मुख्य कारण असे दिसते की, इंग्लिश मीडियमच्या शाळा निघाल्यामुळे पटसंख्या घटते आहे.
लीला शिंदे म्हणाल्या की, मी मराठीतून जवळपास ४० मुलांच्यासाठी पुस्तके लिहिली आहेत. सर्वसाधारण समाजात दारिद्र्य आणि गरिबी असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके मिळत नाहीत. मराठी भाषिकात अनेक गट तट आहेत, आमच्या मराठवाड्याकडे जे लेखन करतात त्यांच्या भाषेत परिसराचा प्रभाव असणारच आहे. शहरी भागात लहान मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शिक्षण अधिकारी यांनी मुलांना उत्तम बाल वाड्मय वाचण्यास मिळवून दिले पाहिजे.
नितीन ठाकरे म्हणाले की ‘प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मराठी भाषेतच व्हावे. इंग्रजी शाळा वाढवण्याचे काम सरकारच करीत आहे. सरकारचे शिक्षणाकडे लक्ष कमी आहे. विना अनुदानितकडे शासनाचे लक्ष आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी परकीय भाषेमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा ते आपल्या मातृभाषेमध्येच देणे गरजेचे आहे त्याकरता जे आपले शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा मी आता म्हटलं त्या पद्धतीने आपला उच्च माध्यमिक असेल किंवा त्याच्या पुढच्या जे काही प्रोफेशनल कॉलेज आपण म्हणतो तिथे सुद्धा त्या मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. इंजीनियरिंग कॉलेजचा सिल्याबस सुद्धा मराठी मध्ये असावा, अशा प्रकारचा मतप्रवाह आता सुरू झालेला आहे.
दादाजी भुसे यांनी परवा ही घोषणा केली की, ज्या केंद्रीय शाळा आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा मराठी हा विषय आम्ही आता अनिवार्य करणार आहोत. मी त्या निमित्ताने त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आतापर्यंत केंद्रीय शाळांमध्ये अशा प्रकारचा निर्णय कधी झाला नव्हता आणि त्यामुळे कुठल्याही माध्यमाची शाळा असो त्या शाळेमध्ये मराठी विषय घेतलाच पाहिजे. आपल्याकडे कुठली गोष्ट अनिवार्य केल्याशिवाय ती आपण स्वीकारत नाही आणि म्हणून या निमित्ताने किंवा मंत्रिमंडळाचे या निमित्ताने अभिनंदन करतो आणि मराठी भाषेला खरंच चांगले दिवस आहेत. आपण सगळे मिळून प्रयत्न केला तर नक्कीच ही भाषा पुढे जाईल.
लीला शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ज्ञान भाषा व्हायला हवी. बोली भाषा टिकली तर मराठी भाषा टिकेल, मराठी भाषा यातूनच समृद्ध होईल. बोली भाषा एकजीव व्हायला हवी.
११ कोटी मराठी भाषिक लोक आहेत. मराठीमध्ये आपण सॉफ्टवेअर करण्याची गरज या संमेलनात व्यक्त करण्यात आली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *