अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर; निना कुलकर्णी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने (अभामानाप) २०२४ वर्षासाठीचे आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले. यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेत्री निना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी नाट्यसृष्टीतील त्यांच्या प्रदीर्घ आणि अतुलनीय योगदानाचा हा गौरव आहे. प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनापित्यार्थ 14 जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो.यावर्षी नीना कुलकर्णी यांच्यासह अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा सांस्कतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्योगमंत्री तथा अ.भा.मराटी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, तहहयात विश्वस्त शशी प्रभू. मोहन जोशी, अशोक हांडे यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.

निना कुलकर्णी यांच्या कारकिर्दीचा गौरव

निना कुलकर्णी यांनी मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीवर विविध प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, भावनिक खोली, आणि भूमिकेशी एकरूप होण्याची क्षमता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ‘आई रिटायर होतेय’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या अष्टपैलू कारकिर्दीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

14 जून रोजी दुपारी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडेल. जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत, मराठी रंगभूमी, पुणे निर्मित गोविंदायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये संगीत शारदा, संगीत संशयकल्लाळ, संगीत मच्छकटिक नाटकातील प्रवेशांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमामध्ये निनाद जाधव, श्रद्धा सबनीस, वैभवी जोगळेकर, सूदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर यांचा सहभाग असणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *