ठाण्यातील भरवस्तीत हरीण शिरलं, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं, अखेर काय झालं?

ठाण्यातील गजबजलेल्या कासारवडवली परिसरात सोमवारी एक अनोखी घटना घडली. हायपर सिटी मॉलजवळील एमबीसी पार्क परिसरातील ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकले होते. ही माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत वन विभाग आणि वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सून प्रयत्नांनंतर हरणाची सुखरूप सुटका करण्यात आली. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. वैद्यकीय तपासणीनंतर ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात परत सोडण्यात आले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील नागरी वस्तीमध्ये वन्यजीवांची वावर वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दोन-तीन दिवसांपासून भटकंतीत होतं हरीण

वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक ओंकार कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हरीण गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिसरात दिसत होते. अन्न व पाण्याच्या शोधात ते शहरात शिरले असावे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हरणाला राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये मुक्त करण्यात आले, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. हे हरीण या ठिकाणी आले कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *