आपण सारेच जाणतो. सुरुवातीतच दडलेला असतो शेवट. आणि शेवटी… असते नुकतीच जागी झालेली सुरवात!
भय, क्षय आणि अंत या तिन्ही गोष्टी अटळ, अपरिहार्य असतात. पण त्या “अंतः अस्ति प्रारंभः” या उक्तीनुसार नव्याला जन्म देणाऱ्याही असतात. म्हणूनच २०२४ हे, तुम्हाला – आम्हाला अनेक चढ – उतार दाखविणारे वर्ष, आता सरत आले आहे. पण या मध्यरात्रीच्या गर्भातच २०२५ चा उषःकाल दडलेला आहे.
उद्या उगवणारा प्रभातीचा सूर्य येईल घेऊन नवीन वर्षाच्या नव्या कहाण्या… ज्यात असतील, सुखदुःखाच्या अनेक घटना…
कारण वर्ष बदलले तरी,
बदलत नसते आयुष्य.
राहतात माणसे तशीच
आपल्या अवतीभवतीची.
पण तरीही असतो आनंद,
आयुष्यात एक वर्ष जोडल्याचा…
वयाच्या, पृथ्वीवरील वास्तव्याच्या बेरजेमध्ये…
कॅलेंडर वरील तारखा,
अमावस्या, पौर्णिमा, बिज,
जानेवारी, मार्च एक एक महिना,
एक एक दिवस,
आपण फक्त पाहत बसतो.
पण आपल्या नकळत,
“काळ” ते मोजत असतो,
क्षणो क्षणी…
म्हणून जाणावा अंतातील आरंभ,
समजून घ्यावा प्रत्येक प्रारंभाचा अंत …
असे गर्जून सांगती संत.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
– महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply