आरोपी प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध अपमानकारक विधानं करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. तो गेल्या चार दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता आणि तेथून थेट तेलंगणात पळून गेला होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तेलंगणातून अटक केली. प्रशांत कोरटकरविरोधात नागपूर, कोल्हापूर आणि जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत. अटकपूर्व जामीन दिल्यानंतरदेखील कोरटकर समोर उपस्थित झाला नाही. त्याचा जामीन फेटाळल्यानंतर अटक करण्यासाठी कोल्हापूर येथील पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले, परंतु त्याच्या निवासस्थानी तो आढळला नाही. पोलीस पथकाने चंद्रपूर तसेच मध्यप्रदेशमध्ये त्याचा शोध घेतला असून बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या आणि नागपूर सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने शोध सुरू आहे. चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये कोरटकर मुक्कामी असतानाच कोल्हापूर पोलिसांनी छापा घेतला, परंतु काही तासांपूर्वी त्याला पोलिसांच्या माहितीमुळे तो पळून गेला. फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीसाठी आणि आवाजाचे नमुने घेण्यासाठी अटक होणे गरजेचे असल्याने तो शोधण्यात येत होता. अंतरिम जामीन मिळाल्यामुळे अटक करता येत नव्हती. कोरटकरने पळताना बदलत्या वाहनांचा वापर केला, ज्यामुळे कोल्हापूर पोलिसांना तपासात अडचणी आल्या. अखेर दुसऱ्या वाहनाचा शोध लागल्याने ते तेलंगणात जाऊन त्याला अटक करण्यात यशस्वी झाले.

कोल्हापूरातील रहिवासी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर, ब्राह्मण समाजाविरुद्ध द्वेषाच्या आरोपाखाली तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरने सावंत यांना फोन करून धमकी दिली. फेसबुकवर पोस्ट केलेल्या संवादात कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून घरात येऊन मारण्याची धमकी दिली असल्याचे नमूद केले गेले. त्याचबरोबर, कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधानं केल्यामुळे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *