पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीला महापूजा करणार

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षांच्या खंडानंतर येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शेवटची आषाढी एकादशीची शासकीय पूजा २०१९ मध्ये केली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वर्षा या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांना या महापूजेसाठी सपत्नीक उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या प्रसंगी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, प्रकाश जवंजाळ, शिवाजीराव मोरे आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते. याच कार्यक्रमात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते फडणवीस यांचा वीणा, वारकरी पटका, श्रीची मूर्ती, उपरणे आणि चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली शासकीय पूजा २७ जुलै २०१५ रोजी केली होती. त्यानंतर १५ जुलै २०१६ आणि ४ जुलै २०१७ रोजीही त्यांनी महापूजा केली. मात्र, १२ जुलै २०१८ रोजी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते मुख्यमंत्रिपदी असूनही पंढरपूरला जाऊ शकले नव्हते. त्यानंतर ११ जुलै २०१९ रोजी त्यांनी पुन्हा आषाढीची महापूजा केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी एकादशीच्या महापूजेला गेले होते.यावेळी फडणवीस यांना आषाढी यात्रेच्या नियोजनाची तयारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन कामाची माहिती तसेच विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या जलद व सुलभ दर्शनासाठी राबविण्यात येणाऱ्या टोकन पद्धतीबद्दल माहिती देण्यात आली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *