भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर चीनची प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचा पाठीराखा देश म्हणून ओळख असलेलता चीन हल्ल्यानंतर भारतावर भडकला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो, असं चीनने म्हटलं आहे.
भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताने केलेल्या हल्ल्यावेळी बहावलपूरमध्ये 200 हून अधिक दहशतवादी होते, अशी माहिती मिळत आहे. तर मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी, मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी, कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी, सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी, गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी, भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी, चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी होते, अशी माहिती सांगितली जात आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताने केलेली कारवाई दुदैवी असल्याचं चीननं म्हटलं आहे. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या चीनचं नेहमीप्रमाणे रडगाणं गाण्यास सुरुवात केली आहे.
Leave a Reply