भाजप नेते आणि राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिंदू मटण दुकानदारांना ‘मल्हार सर्टिफिकेट’ देण्याच्या त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना चांगलेच सुनावले आहे.
नितेश राणे यांनी जाहीर केले की, मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटीक वर्गाला हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढण्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हे मुद्दाम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला, तर आप आणि एआयएमआयएमनेही याला तीव्र विरोध केला.
अजित पवारांची स्पष्ट भूमिका
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 112 व्या जयंती निमित्त कराड येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी नितेश राणेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, सरकारमधील तसेच विरोधकांमधील सदस्यांनी कोणतेही वक्तव्य करताना देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. नितेश राणेंनी हे विधान का केले, हे मला माहित नाही. त्यांच्या वक्तव्यामागचा हेतूदेखील माहिती नाही. पंरतु आपल्या देशाबद्दल अभिमान असणार मुस्लिम समाज देशप्रेमीच आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रात देशाबद्दल प्रेम असणारा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असून इतिहास आपण वाचला आहे. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत. मोठमोठ्या लोकांनी जी काही पुस्तक लिहिली त्यात ती आहेत. तर इतिहासाच्या संशोधनातून याची माहिती खोलवर मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिमही आहेत. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply