मुंबई – राज्याचे उपमुखमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 10 वेळ राज्याचे अर्थसंकल्प सादर केले आहेत. आता ते ११ व्या वेळा अर्थसंकल्प पटलावर ठेवणार आहेत. आत्तापर्यंत सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. अजित पवार हे पहिल्यांदा 2011 साली अर्थमंत्री झाले. 2011-2012 ते 2014-15, 2020-21 ते 2022-23, 2024-25 (अंतरिम आणि अतिरिक्त असे दोन) आत्तापर्यंत 10 अर्थसंकल्प सादर केले आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचेच जयंत पाटील यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. आता अजित पवार जयंत पाटील यांना अजित पवार मागे टाकणार आहेत.
आत्तापर्यंत कोणी, किती वेळा अर्थसंकल्प सादर केला
- बॅ. शेषराव वानखेडे – 13
- अजित पवार – 10
- जयंत पाटील – 10
- सुशीलकुमार शिंदे – 9
- बॅ. रामराव आदिक – 7
- सुधीर मुनगंटीवार – 6
- मधुकरराव चौधरी – 5
- यशवंतराव मोहिते -4
- एकनाथ खडसे – 3
- स. गो. बर्वे – 2
- महादेव शिवणकर – 2
- दिलीप वळसे पाटील – 2
- शंकरराव चव्हाण – 1
- देवेंद्र फडणवीस – 1
- गोपीनाथ मुंडे -1
- सुनील टाटकरे – 1
- डॉ. व्ही. सुब्रमण्यम – 1
Please follow and like us:
Leave a Reply