मराठी हास्य कलाकाराला फसवल्याप्रकरणी अक्षय कुमार नावाच्या ठगाला अटक

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय हास्य कलाकार एका मोठ्या सायबर फसवणुकीचा बळी ठरला असून, ६१ लाख रुपयांची आर्थिक गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला उत्तर मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे.अक्षय कुमार गोपाईंकुमार (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या बँक खात्यावर फसवणुकीतील मोठी रक्कम जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे.घटनेचा धक्का देणारा तपशील असा की, कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय हास्य कलाकाराला २३ फेब्रुवारी रोजी एक अज्ञात व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्यात “घरबसल्या पार्ट टाईम जॉब करून सहज कमिशन मिळवा असे आमिष दाखवण्यात आले होते.लिंकवर क्लिक करून त्याने काम सुरू केले आणि सुरुवातीला काही रक्कम मिळाल्यामुळे विश्वास बसला. पण पुढे तीच लिंक त्याच्या खात्यातून लाखो रुपये ओढण्यासाठी वापरण्यात आली.

मराठीतील लोकप्रिय हास्य कलाकार एका ‘पार्ट टाईम नोकरी’च्या आमिषाला बळी पडून तब्बल ६१ लाखांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, फसवणुकीतील रक्कम आरोपीच्या खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक झालेला व्यक्ती मुख्य सूत्रधार नसला, तरी त्याचे बँक खाते फसवणुकीसाठी वापरण्यात आले होते.
या गुन्ह्याचा तपशील अधिक धक्कादायक आहे. २३ फेब्रुवारी रोजी, कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय हास्य कलाकाराला एका अज्ञात व्हॉट्सअॅप क्रमांकावरून “घरबसल्या लाईक्स देऊन पैसे मिळवा” असा मेसेज आला.
त्याने दिलेल्या लिंक्सवर क्लिक करत इन्स्टाग्राम व्हिडिओंना लाईक्स देण्याचे टास्क सुरू केले. काही कामांनंतर खात्यात थोडी रक्कम जमा झाल्याने त्याचा विश्वास बसला आणि तो टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडला गेला.टास्क पूर्ण करून ११,००० रुपयांचा पहिला कमिशन मिळाल्यावर, कलाकाराने पुढील “पेड टास्क”साठी हजारोंच्या गुंतवणुकीला सुरुवात केली. प्रत्येक टास्कनंतर ३०% परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. सुरुवातीला परतावे वेळेवर मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने सातत्याने लाखो रुपयांची गुंतवणूक केली.एका टप्प्यावर, त्याच्या नावावर सिस्टममध्ये २७.५१ लाख रुपयांचा नफा दाखवण्यात आला. मात्र, रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच त्याला सांगण्यात आले की, त्याचा “टास्क क्रेडिट स्कोअर” फक्त ८० आहे आणि १०० पूर्ण झाल्यावरच पैसे मिळतील. स्कोअर वाढवण्यासाठी त्याने आणखी १९.७० लाख रुपये गुंतवले.सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. संबंधित कलाकाराने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पुढील कारवाई सुरू आहे.अशाच प्रकारच्या घोटाळ्यांसाठी त्यांचे बँक खाते प्रदान करणाऱ्या इतर व्यक्तींचीही पोलिसांनी ओळख पटवली आहे आणि त्यांना शोधून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोरिवली न्यायालयात हजर केल्यानंतर, अक्षय कुमारला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *