युतीधर्म धोक्यात? बालाजी किणीकर यांचा भाजपला इशारा! “आमच्याकडेही यादी तयार आहे”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच राज्यात पक्षबदलाचं सत्र जोरात सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मित्रपक्षांमध्येच राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अलीकडेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकारणात हलचल माजली आहे.

2015 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यादव नंतर शिवसेनेत आले होते. मात्र आता त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे युतीतील तणाव उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी भाजपवर युतीधर्म मोडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

किणीकर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात ठरलं होतं की, युतीतील पक्ष आपापल्या पदाधिकाऱ्यांना पळवणार नाहीत. मात्र भाजपने हा करार मोडला आहे. जर त्यांनी असंच केलं, तर आमच्याकडेही भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी तयार आहे. त्यांनाही आमच्या पक्षात घेऊ शकतो.”

किणीकर यांच्या या इशाऱ्यामुळे अंबरनाथमधील युतीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. स्थानिक सत्ता वाटप, आगामी रणनीती आणि निवडणूक समीकरणांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. भाजप यावर काय भूमिका घेते आणि तणाव कमी करण्यासाठी युतीत कोणती पावले उचलली जातील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *