मुंबई: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजीराजे यांच्याशी केली होती. त्यांच्या वक्तव्याचा सत्ताधारी आमदारांकडून मोठ्याप्रमाणात विरोध झाला. अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधानपरिषदेचे काम तीन वेळा रोखून धरले. अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पुढील कामकाज सुरू झालं.
काय म्हणाले होते अनिल परब?
राज्यालाच्या भाषणावर चर्चा करत असताना गुरुवारी अनिल परब बोलत होते. त्यादरम्यान त्यांनी शंभूराजे यांच्यावर झालेल्या छळाची तुलना स्वतःशी केली. ते म्हणाले, ” संभाजीराजे यांचं धर्म बदलण्यासाठी छळ झाला. त्याचप्रमाणे पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला. ईडी, सीबीआयच्या नोटीस आल्या पण पक्ष बदलला नाही, असं वक्तव्य केलं होतं. शुक्रवारी कामकाज सुरू होताच प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उचलून धरत माफीची मागणी केली.
शंभूराज देसाई म्हणाले’ छत्रपती संभाजी राजे यांच्याशी तुलना करणे चुकीचे आहे. परब यांनी संभाजी महाराजांच्या समाधीजवळ नतमस्तक होऊन माफी मागावी, अशी मागणी केली. मंत्री नितेश राणे यांनीही माफी मागावी अशी मागणी केली. त्यामुळे तीनदा सभागृहाचं काम सत्ताधाऱ्यांनी रोखून धरलं होतं. अखेर विरोधी पक्ष नेते यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पुढील कामकाज सुरळीत सुरू झाले. मात्र दुसरीकडे माफी न मागण्यावर अनिल परब ठाम होते.
Leave a Reply