टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या काही विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाच्या “विद्यार्थीविरोधी” धोरणांविरोधात बुधवारी संध्याकाळी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या कॅम्पसबाहेर निदर्शने ‘कलेक्टिव मुंबई’ या विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सहभागी झालेल्या काही जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले.
निलंबित संशोधकाच्या समर्थनार्थ आंदोलन
या निदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांसोबत लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि डाव्या व दलित संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते. त्यांचा उद्देश ‘लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव’ हा होता. याशिवाय, स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि निलंबित संशोधक रामदास प्रिनी शिवानंदन यांना पाठिंबा देण्याच्या हेतूनेही हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्यांमध्ये स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अखिल भारतीय सरचिटणीस मयूख बिस्वास, स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य सचिव रोहिदास जाधव आणि स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांचा समावेश होता. याशिवाय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये शैलेन्द्र कांबळे, विवेक मॉन्टेइरो, नारायण, सुगंधी फ्रान्सिस, अर्माटी इराणी, संजय कांबळे आणि रेखा देशपांडे यांचाही समावेश होता.
प्रशासनाची सक्त ताकीद – ‘आंदोलन टाळा, अन्यथा परिणाम भोगा!
आंदोलनाच्या एक दिवस आधीच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस प्रशासनाने विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होऊ नये असा इशारा दिला होता. विद्यार्थी कल्याण विभागाचे डीन, प्रा. एम. मरियप्पन यांनी ई-मेलद्वारे नोटीस जारी करत,तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तुम्ही कॅम्पसच्या आत किंवा बाहेर कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये. जर कुणी असे केले, तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. संस्थेच्या नियमांचे पालन करा. स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की, महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्याने लोकशाही हक्कांवर हल्ला होत आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा हा प्रयत्न आहे” असं ते म्हणाले.
Leave a Reply