बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीये. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे हदरावणारी घटना घडली आहे. एका महिला वकीलाला स्पीकर आणि पिठाच्या गिरणीची तक्रार का केली म्हणून बेशुद्ध होईपर्यंत गावातीलच 10 जणांनी जनावराप्रमाणे मारहाण केली आहे. पीडित महिलेच्या जबाबावरून युसूफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 10 पैकी मुख्य आरोपी हा गावातील सरपंचचं असल्याने खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण केली आहे. यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुलीच्या तक्रारीनुसार सरपंच अनंत अंजान, सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा सपकाळ, नवनाथ जाधव, मृत्युंजय अंजान, अंकुश अंजान, सुधीर मुंडे आणि नवनाथ मोरे यांच्यावर युसूफ वडगाव पोलिसांनी बीएनएस 2024 नुसार 118 (2), 118 (1), 115 (2), 74, 189 (2), 191 (2), 190, 352, 351 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Reply