पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा! पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे हवामान खात्याने दिले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21 ऑक्टोबरपासून 25 ऑक्टोबरपर्यंत कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यांत पूरस्थिती आणि नुकसानीतून सावरत असलेल्या शेतकऱ्यांना या नव्या अंदाजामुळे चिंता वाटू लागली आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली होती, जनावरांचे बळी गेले आणि घरे उद्ध्वस्त झाली होती. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाल्याने नागरिक वैतागले आहेत.

हवामान विभागाचे अंदाजानुसार अलर्ट:

21 ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली — येलो अलर्ट

22 ऑक्टोबर: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा — येलो अलर्ट

23 ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, नांदेड, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली — येलो अलर्ट

24 ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, बुलढाणा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली — येलो अलर्ट

25 ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि संपूर्ण विदर्भ — येलो अलर्ट

हवामान खात्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण आणि कापणीसंबंधी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे सुचवण्यात आले आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *